शंकरपाळी रेसिपी मराठी | Shankarpali Recipe in Marathi

Shankarpali Recipe in Marathi

 

इथे आम्ही शंकरपाळी रेसिपी मराठी दिली आहे. या शंकरपाळी रेसिपी नुसार तुमची शंकरपाळी नक्की खुस खुशीत आणि चवदार होईल. म्हणून ना चुकता स्टेप नुसार शंकरपाळी करा.
 
शंकरपाळी ची रेसिपी | शंकरपाळी रेसिपी मराठी | Shankarpali Recipe in Marathi
 
शंकरपाळी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
१. अर्धा कप दूध 
२. अर्धा कप तूप 
३. पाऊण कप पिठी साखर 
४. ३.५ कप मैदा
५. तेल 
 
शंकरपाळी बनविण्याची प्रक्रिया 
स्टेप १
एक भांडे घ्या त्यात सगळ्यात आधी तूप घाला, पिठी साखर, नंतर दुध घाला आणि हे मिश्रण चांगले ढवळून घ्या आणि मध्यम गॅस वर २-३ मिनिट गरम करा. साखर विरघळे पर्यंत गरम करा आणि नंतर गॅस बंद करा. ( लक्षात ठेवा या मिश्रणाला उकळी येऊ देऊ नका नाहीतर दुध फाटू शकते )
स्टेप २
आता मैदा घ्या आणि या मैद्या मध्ये दुध, तूप, साखरेचे मिश्रण घाला.
स्टेप ३
आता या मिश्रणाचा गोळा बनून घ्या हा गोळा खूप पातळ किवां खूप घट्ट बनवू नका मध्यम गोळा बनवा गोळ्याला थोड्या भेगा पडल्या तरी चालतील पण गोळा मध्यम बनवा. 
स्टेप ४
हा गोळा बनल्यानंतर एक बाउल मध्ये हा गोळा काढून घ्या आणि एकतास झाकून ठेवा.
स्टेप ५
एक तसा नंतर या गोळ्यातून थोडा गोळा काढून लाटायला घ्या लाटायच्या आधी हा गोळा चांगला एकजीव करून घ्या.
स्टेप ६
लाटून झाल्यावर शंकरपाळी कापून घ्या आणि त्या तुम्हला पाहिजे तस्या आकारात कापा जास्त करून चौकोनी कापतात.
स्टेप ७
शंकर पाळ्या लाटून झाल्यवर एका कढईत तेल घ्या व हे तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या. 
स्टेप ८
तेल मध्यम गरम करा आणि आता त्यात शंकरपाळ्या टाकून तळून घ्या. 
स्टेप ९
या शंकर पाल्यांना सगळ्या बाजूने तांबूस रंग येईपर्यंत तळायच्या आहेत तसेच तांबूस रंग येपर्यंत शंकर पाळ्या ढवळत राहा.
स्टेप १०
२ ते ३ मिनीटांनी शंकर पाळी तांबूस झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्या. 
स्टेप ११
आता तुमच्या शंकर पाळ्या खायला तयार आहेत.
 
 
हे पण वाचा – 

Leave a Comment