इथे आम्ही गुलाबजाम रेसिपी मराठी दिली आहे.इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही घरतील पदार्थ वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमचे गुलाबजाम तयार होईल.
गुलाबजाम रेसिपी मराठी | Gulab Jamun Recipe in Marathi
लागणारे साहित्य:
मैदा
बेकिंग सोडा एक चिमूटभर
खोया / मावा / खवा
साखर
पाणी
वेलची पूड
तेल
बनवण्याची प्रक्रिया :
१. एका भांडयात मैदा घ्या आणि चिमुटभर बेकिंग सोडा घाला चांगले मिसळा.
२. खवा/खोया/मावा (घाला तुमचा कडे जे उपलब्द असेल ते)चांगले मिक्स करावे आणि मैदा पीठात मळून घ्या.
३. कणिक तयार झाल्यावर एका भांड्यात हस्तांतरित करा झाकून ठेवा आणि सुमारे २०-२५ मिनिटे.
४. कढईत पाणी घ्या आणि त्या मध्ये साखर घाला मध्यम आचेवर गरम करावे सर्व साखर विरघळली कि पाक तयार होईल
५. वेलची पूड घाला चांगले मिसळा आणि गॅस बंद करा.
६. आपण तयार केलेल्या कणिकेचे गोळे तयार करून घ्या लिंबापेक्षा लहान आकाराचा एक गोळा असावा
७. सर्व कणकीचे गुळगुळीत गोळे तयार करून घ्या त्यावर कुठलीही तडे जाऊ देऊ नये.
८. मध्यम आचेवर तेल गरम करा व मध्यमच आचेवर हे सर्व गोळे थोडे तळून घ्या
९. ह्या गोळ्यांना लालसर रंग येई पर्यंत सर्व गोळे तळून घ्या
१०.नंतर यांना तेलातून बाहेर कडून घ्या
११.हे तळलेले सर्व गोळे हळूहळू तयार केलेल्या पाकात घाला चांगले पाकात २०-२५ मिनिटे मुरु दया
१२.अशा प्रकारे तुमचे गुलाबजाम तयार होतील
हे पण वाचा –