व्हेज बिर्याणी मराठी रेसिपी | Veg Biryani Recipe in Marathi

व्हेज बिर्याणी मराठी रेसिपी | Veg Biryani Recipe in Marathi

Veg Biryani Recipe in Marathi: आज आपण पाहणार आहोत व्हेज बिर्याणी मराठी रेसिपी. हि व्हेज बिर्याणी रेसिपी Veg Biryani Recipe in Marathi आम्ही स्टेप नुसार दिली आहे जेणे करून काही चूक होणार नाही व व्हेज बिर्याणी चांगल्या रीतीने बनेल.

व्हेज बिर्याणी मराठी रेसिपी | Recipe of Veg Biryani in Marathi

व्हेज बिर्याणी लागणारे साहित्य:

मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

या रेसिपी मध्ये आपण व्हेज बिर्याणी मसाला पण घरीच बनवणार आहोत.

१. चमचा जीरा – १ चमचा
२. चाक्रीफुल / स्टार फुल – २/३ नग
३. दगडफूल – १ चमचा
४. लवंग – ४/५ नग
५. काळीमिरी – ४/५ नग
६. जायपत्र – २/३ नग
७. दालचिनी – २/३ तुकडे
८. मसाला वेलची – २/३ नग
९. हिरवी वेलची – २/३ नग
१०. तमालपत्र – २/५ नग

व्हेज बिर्याणी भात शिजवताना लागणारे मसाले

१. तमालपत्र – २/५ नग
२. जावित्री – १ नग
३. चाक्रीफुल / स्टार फुल – २/३ नग
४. हिरवी वेलची – २/३ नग
५. दालचिनी – २/३ तुकडे
६. जीरा – १ चमचा
७. काळीमिरी – ४/५ नग
८. लवंग – ४/५ नग

व्हेज बिर्याणीसाठी लागणारा भाजीपाला

१. गजर ( २ ते ३ सेंटीमीटर चे बारीक लांब तुकडे) – ४/५ नग
२. श्रावणी घेवडा ( २ ते ३ सेंटीमीटर चे बारीक लांब तुकडे) – ४/५ नग
३. बटाटा ( एका बटाट्याचे बारीक तुकडे करून ) – १ नग
४. पनीर – ८/९ तुकडे
५. मटार – पाव कप
६. फ्लॉवर – ४/५ तुकडे
७. दही – अर्धा कप
८. कोथिंबीर – बारीक चिरलेली
९. पुदिना पाने – ४/५ नग
१०. हिरव्या मिरचीचे तुकडे
११. लाल तिखट
१२. धने पूड
१३. आलं लसून पेस्ट
१४. बिर्याणी मसाला – १ चमचा ( जो आपण बनवणार आहे तो)
१५. मीठ
१६. तांदूळ (बासमती) – १.५ कप
१७. बारीक चिरलेला कांदा
१८. तूप
१९. तेल
२०. बारीक चीरलेल टोमाटो
२१. तळलेला कांदा – एक दोन चमचे

या रेसिपी मध्ये ४ ते ५ लोकांसाठी पुरेल एवढे प्रमाण गृहीत धरून सर्व समान घेतले आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता.

व्हेज बिर्याणी मसाला बनविण्याची प्रक्रिया : 
बिर्याणी मसाला बनवताना मसाला भाजून घेण्याची गरज नाही कारण व्हेज बिर्याणीचा मसाला कच्चा असतो. सगळ्यात आधी मिक्सर मध्ये तमालपत्र, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, जायपत्र, काळीमिरी, लवंग, दगडफूल, चाक्रीफुल, जीरा हे सर्व घालून मिक्सर वर बारीक करून घ्यायचे आहे. आता आपला व्हेज बिर्याणी मसाला तयार आहे.

व्हेज बिर्याणी बनवण्याची प्रक्रिया

स्टेप १: भाज्या म्यारीनेत करणे : एका बाउल मध्ये दही टाका त्यात लाल तिखट, धने पूड, आलं लसून पेस्ट आणि मीठ ते टाकून चांगलं मिसळून घ्या. मिसळून झाल्यानंतर एक चमचा बिर्याणी मसाला घाला. त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाने, बारीक चिरलेले कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे हे मिश्रण परत एकदा चांगले मिसळून घ्या. त्यानंतर यामध्ये बटाटा, फ्लॉवर, गजर, श्रावणी घेवडा आणि मटार हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचे आहे.

स्टेप २: तांदुळामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा चांगला धुवून घ्या.

स्टेप ३: तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यात पाणी घालून अर्धा तास भिजायला ठेवा.

स्टेप ४: त्यानंतर तवा गॅस वर ठेवा आणि एक चमचा तेल ओता आणि तेल गरम करून घ्या.

स्टेप ५: त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला आणि नीट परतून घ्या सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या.

स्टेप ६: त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घाला आणि टोमॅटो पण ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.

स्टेप ७: त्यानंतर आलं-लसून पेस्ट, धनेपूड, हळद, लालतिखट, मीठ चवीपुरतं, बिर्याणी मसाला २ चमचे, कोथिंबीर, आणि पुदिना घाला आणि २-३ मिनिटे शिजून घ्या.

स्टेप ८: मसाले चांगले शिजल्यानंतर यामध्ये म्यारीनेत केलेल्या भाज्या घाला त्यानंतर हे मिश्रण चांगले एकत्र करून २-३ मिनिटे हलवत राहा.

स्टेप ९: २-३ मिनिटे झाल्यानंतर २-३ चमचे पाणी घालून चांगले मिसळून घ्या आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेऊन भज्या ७० ते ८०% शिजवून घ्या.

स्टेप १०: त्यानंतर एक भगुल्यात पाणी उकळायला ठेवा पाण्यचे प्रमाण तुमच्या तांदुळानुसार घ्या आणि पाणी उकळल्यावर त्यात चवीपुरतं मीठ टाका.

स्टेप ११: त्यानंतर त्या पाण्यात तमालपत्र, जायपत्र, चाक्रीफुल, दालचिनी, लवंग, वेलची, काळीमिरी, जीरा, दोन चमचे तूप टाकून घ्या.

स्टेप १२: सर्व मसाले टाकून झाल्यावर अर्धा तास भिजत घातलेला तांदुळ यामध्ये टाकून चांगले मिसळून घ्या आणि ७० ते ८० % भात शिजून घ्या.

स्टेप १३: हा भात शिजवून झाल्यवर त्यातले २-३ चमचे पाणी एक वाटीत काढून ठेवा.

स्टेप १४: आता आगोदर ज्या भज्या ७० ते ८०% शिजवलेल्या आहेत त्या घ्या या भज्यामध्ये पनीर घाला आणि हे मिश्रण चांगले एकत्र करा आणि पनीर थोडेसे शिजवा.

स्टेप १५: त्यानंतर जो ७० ते ८० % शिजवलेला भात आहे तो घ्या आणि त्यातील पाणी काढून तो भात या शिजवलेल्या भाज्यावरती पसरावा. हा भात दोन तीनथर करून सगळा पसरावा.

स्टेप १६: आता या मिश्रणावर साजूक तूप २-३ चमचे, तळलेला कांदा, बारीक चिरलेले कोथिंबीर, पुदिन्याची पाने, आणि भात शिजवून झाल्यावर वाटीत जे पाणी काढले होते ते पाणी २-३ चमचे टाका.

स्टेप १७: आता हे मिश्रण झाकून ठेवा आणि गॅस फुल करून ५ मिनिटे शिजवून घ्या त्यानंतर गॅस मध्यम ठेऊन १० मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर गॅस सगळ्यात कमी करा आणि त्यावर २० मिनिटे बिर्याणी शिजून घ्या.

आता तुमची व्हेज बिर्याणी खायला तयार आहे आता बिर्याणी सर्वांना वाढण्यासाठी तयार आहे.
Veg Biryani Recipe in Marathi
Veg Biryani Recipe in Marathi

हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment