बेसन लाडू रेसिपी मराठी | Besan Ladoo Recipe in Marathi

बेसन लाडू रेसिपी मराठी | Besan Ladoo Recipe in Marathi

Besan Ladoo Recipe in Marathi: इथे आम्ही बेसन लाडू रेसिपी मराठी दिली आहे. या रेसिपी मध्ये आम्ही लागणारे साहित्य आणि बनवण्याची प्रक्रिया पण दिली आहे. तसेच हे रेसिपी दिलेल्या स्टेप नुसार करा म्हणजे तुमचे बेसन लाडू उत्तम होतील. 
बेसन लाडूसाठी लागणारे साहित्य :
१. एक कप साजूक तूप / डालडा
२. दीड कप बेसन
३. वेलची पूड
४. काजू चे तुकडे
५. मनुके 
 
बेसन लाडू बनवण्याची प्रक्रिया :
१. सगळ्यात आधी काढई किवां पॅन मध्ये चार मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्या. साजूक तूप नसेल तर डालडा पण वापरू शकता.
२. नंतर यामध्ये दीड (१.५) कप बेसन घाला
३. त्यानंतर हे मिश्रण गॅस वर ठेवा आणि मंद आचेवर भाजून घ्या भाजत असताना एक – दोन चमचे तूप टाका. तुमच्या प्रमाणानुसार तूप टाका.
४. हे मिश्रण भाजत असताना हे मिश्रण हलवत राहा जेणे करून ते काढई किवां पॅन ला चिकटणार नाही. 
५. हे बेसन चे मिश्रण लालसर रंग येईपर्यंत भाजा. १० मिनिट भाजल्यावर हा रंग येईल. 
६. बेसनाचा रंग लाल झाल्यवर गॅस बंद करा आणि त्यामध्ये वेलची पूड एक चमचा टाका आणि त्यानंतर तुमच्या आवडी नुसार काजू टाका. 
७. आता हे मिश्रण चांगले मिसळा आणि बेसन थोडे थंड होईपर्यंत बाजूला ठेवा. 
८. हे मिश्रण कोमाट झाल्यवर यात दोन कप पिठीसाखर घाला. हे प्रमाण तुमच्या आवडी नुसार कमी जास्त पण करू शकता.
९. आत हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि लाडू वळायला घ्या.
१०. लाडू वळताना त्यावर एक मनुका लावा आणि लाडू वळा.
११. आता हे वळलेले एका प्लेट मध्ये काढा आता हे लाडू खायला तयार आहेत. 
 
 
हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव पूजा पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment