इथे आम्ही चिकन बिर्याणी रेसिपी मराठी दिली आहे, इथे आम्ही सर्वांना करता येईल अशी रेसिपी दिली आहे. या रेसिपीसाठी वेगळे काही लागणार आंही घरातच उपलब्ध असणारे पदार्थ वापरून हि चिकन बिर्याणी आपण बनवू शकता. तसेच हि रेसिपी दिलेल्या स्टेप नुसार करा म्हणजे तुमची चिकन बिर्याणी उत्तम बनेल.
चिकन बिर्याणी रेसिपी मराठी | Chicken Biryani Recipe in Marathi
चिकन बिर्याणी मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
१. दालचिनी – १-२
२. काळिमीरी – ४-५
३. लंवग – ४-५
४. हिरवी वेलची – १
५. मसाला वेलची – १
६. चक्री फुल – १
७. जाविञी – १
८. दगड फुल – २
हे सर्व मसाले मिक्सर मधे बारीक करून मसाला बनवुन घ्या. मिक्सर मध्ये बारीक केल्यावर आता तुमचा बिर्याणी मसाला तयार आहे.
चिकन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य :
१. आर्धा किलो चिकन ( मध्यम पीस )
२. आलं लसुन पेस्ट
३. हळद – १-२ चमचे
४. लिबांचा रस – २ चमचे
५. मीठ चवीनुसार
६. दही – १ वाटी
७. लाल तिखट – १ वाटी
८. धने पुडे – २ चमचे
९. जिरे पुड – १ चमचा
१०. बारीक चिरलेली कोथिंबीर – एक कप
११. पुदीना – २ ते ३ चमचे
१२. साजुक तुप किंवा तेल – १ वाटी
१३. तळलेला कादा – १ वाटी
१४. कणीक – १ वाटी पिठाची
१५. बासमती तांदुळ १ ते २ कप धुवून
१६. शाह जिरं – १ चमचा
१७. काळिमीरी – ४ ते ५
१८. काळीवेलची – १
१९. दालचिनी – १ ते २
२०. लंवग -४ ते ५
२१. तमालपञ – २ ते ३
२२. केशरचे पाणी – अर्धावाटी
चिकन बिर्याणी बनविण्याची प्रक्रिया :
१.अर्धा किलो चिकन धुवून घ्या ते एका भांड्यात काढा आता यामधे एक चमचा आलं लसुन पेस्ट घाला, हळद अर्धा चमचा, एक चमचा लिंबाचा रस, चवीपुरत मीठ बिर्याणी मसाला दोन चमचे ( जो बणवला होतो तो ), एक वाटी दही , लाल तिखट एक चमचा, धने पुड एक चमचा, अर्धा चमचा जिरे पुड, एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन तीन पुदीन्याची पाने आणि २-३ हिरवी मिरची टाका.
३. आता हे मिश्रण चांगल्या रितीने एकजीव करून घ्या आता हे मिश्रण झाकुन 3-4 तासासाठी फ्रीज मधे मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.
४. आता एक कढई घ्या त्यामधे एक ते दोन चमचे तुप किंवा तेल टाका. हे तुप कढईत चांगले पसरवुन घ्या.
५. आता मॅरीनेट केलेले चिकन काढुन घ्या आणि हे चिकन या कढईमधे टाका तसेच यामधे अजुन दोन चमचे पाणी घाला.
६. आता या चिकन वर दोन तीन तुप साजुक तुप घाला, त्यांनतर थोडासा तळलेला कांदा घाला.
७. आता हे मिश्रण झाकुन ठेवा आणि झाकल्यावर झाकणाला सगळ्या बाजुने कनीक लावुन ते हवाबंद करा.
८. आता दुसर्या कढईत चार कप पाणी टाका आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
९. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा शाह जिरें, ३-४ काळ मिरी, १-२ काळी वेलची, १-२ दालचिनीचे तुकडे, ४-५ लंवग, २-३ तमालपञ, १ चमचा साजुक तुप, २ चमचे मीठ, 2 कप बासमती तांदुळ धुतलेले, टाका आता हे मिश्रण गॅस वर शिजवुन घ्या
१०. भात हा ५० ते ६० टक्के शिजवावा पुर्ण शिजवु नये.
११. आता गॅस बंद करा व हा भात उतरून घ्या
१२. आता या भाताचे चिकनवर थर करा एकावर एक असे तादंळाचे थर करून घ्या.
१३. त्यानंतर यावर तांदुळ शिजवलेल्या पाण्याचे दोन तीन चमचे टाका.
१४. त्यावर केशराचे पाणी घाला.
१५. त्यावर थोडांसा बिर्याणी मसाला घाला.
१६. त्यावर थोडीसी कोथंबिर, पुदिना, तळलेला कांदा, 2-3 चमचे साजुक तुप, आता यावर कणीक लावलेले झाकण ठेऊन हवाबंद करून घ्या आणि गॅसवर ठेवा
१७. त्यांनतर मध्यम आचेवर १० ते १५ मिनीटे शिजवा.
१८. त्यानंतर मध्यम पेक्षा थोड्याशा कमी आचेवर १० मिनीटे शिजवा
१९. आता सगळ्यात कमी आचेवर १० मिनीटे शिजवा.
२०. आता गॅस बंद करा आणि पाच मिनीटे थांबा पाच मिनीटांनी हे झाकण उघडा.
२१ आता हे सगळे एकजीव करा आणि आता चिकन बिर्यानी खायला तयार आहे.
हे पण वाचा –