इथे आम्ही पुरणपोळी रेसिपी मराठी दिली आहे. इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही आपण घरात असणारे पदार्थ वापरून बनवू शकता. दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमची पुराण पोळी तयार होईल.
पुरणपोळी रेसिपी मराठी | Puran Poli Recipe in Marathi
लागणारे साहित्य:
कणिक बनवण्यासाठी:
१ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
१/२ चमचा मीठ
२/३ चमचा तेल
पुराण साठी:
१ कप चणा डाळ
एक चिमूटभर हळद
१/२ टीस्पून तेल
गूळ
वेलची पूड
पोळी भाजण्यासाठी: तूप / तेल
बनवण्याची प्रक्रिया:
कणिक बनवण्यासाठी :
१. गव्हाचे पीठ आणि मैदा एका डिशमध्ये घ्या.आपण (आपल्याला हवे फक्त गव्हाचे पीठ वापरू शकता) चवीनुसार मीठ घालून सर्वकाही चांगले मिक्स करावे त्यात थोडेसे पाणी घालून पातळ पीठ मळून घ्या. कणिक जास्त पातळ किंवा घट्ट होऊ नये याची खबरदारी घ्या ज्या भांड्यात कणिक मळत आहेत त्याच्यात थोडे तेल पसरवा आणि छान मऊ होई पर्यंत पीठ मळून घ्या. आपण जितके चांगले मळून घ्याल तेवडी नरम पुरण पोळी.
२. कणिक एका भांड्यात हस्तांतरित करा आणि त्यावर थोडे तेल पसरवा.कमीतकमी १ तासासाठी पीठ झाकून ठेवा.
पुराण साठी:
१. चणा डाळ एका भांड्यात घ्या आणि ती चांगली २ वेळा धुवून घ्या.
२. कुकर मध्ये डाळ,१ हळद,१ तेल घालून मिक्स करावे.आणि त्या मध्ये डाळ किती आहे त्या नुसार पाणी घाला (पाणी थोडे जास्त घाला )
३. झाकण ठेवून डाळ ४/५ शिटीपर्यंत मध्यम आचेवर शिजून घ्यायची उच्च आचेवर शिजवू नका.
४. डाळ शिजल्या डाळी मध्ये उरलेले पाणी नंतर तुम्ही कच्ची आमटी तयार करण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता.
५. डाळ पूर्ण यंत्र मध्ये बारीक करून घ्या किंवा तुमचा कडे उपलब्द असलेल्या कोणत्याही वस्तूने बारीक करून घ्या (मिक्सर,पाटा वरवंटा,बटाटा मशार,रवी )
६.या बारीक डाळीत गूळ घाला आणि ती गॅस वर ठेऊन गॅस चालू करा.मध्यम आचेवर डाळ साधारण १०/१५ मिनिटे किंवा तोपर्यंत शिजवा जाड होई पर्यंत
७. गॅस बंद करा आणि वेलची पूड, जायफळ पावडर घाला चांगले मिसळा.
८. आशा प्रकारे पुराण तयार होईल
पूरण पोली बनवण्यासाठी:
१. मऊ कणिक घ्या कणिकांचा एक छोटा बॉल बनवा.
२. नंतर या बॉलला हाताचा साह्याने पसरट बनवा आणि या मध्ये पुराण भरा आणि सर्व बाजूंनी बंद करून घ्या.
आणि हा तयार झालेला बॉल काळजीपूर्वक रोल करा जेणेकरून पुराण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
३. हा रोल केलेला बॉल लाटून घ्या.
४. मध्यम आचेवर तवा गरम करा.
५. लाटलेली ही पोळी भाजून घ्या.
६. पोळी थोडी भाजल्या नंतर पोळीवर तूप किंवा तेल देखील चमचा साह्याने पसरून घेऊ शकता.
७. पोळी पलटवा आणि तूप दुसर्या बाजूलाही तूप किंवा तेल पसरवा.
८. जेव्हा पोळी दोन्ही बाजूंनी चांगले भाजली असेल तेव्हा ती तव्यावरुन काढून घ्या.
९. अशा प्रकारे तुमची पुराण पोळी तयार असेल.
हे पण वाचा –