ढोकळा रेसिपी मराठी । Dhokla Recipe in Marathi

इथे आम्ही ढोकळा रेसिपी मराठी दिली आहे. इथे आम्ही सर्वांना करता येईल अशी रेसिपी दिली आहे या रेसिपी साठी वेगळे काही लागत नाही घरात असणारे उपलब्ध पदार्थ वापरून हि रेसिपी बनवू शकता हि रेसिपी दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमचा ढोकळा तयार होईल.

Dhokla Recipe in Marathi

 

ढोकळा रेसिपी मराठी । Dhokla Recipe in Marathi

लागणारे साहित्य :

१/२ कप बेसन

१ चमचा रवा

३/४ कप दही

१/२ कप पाणी

१/२ चमचा इनो / सोडा

१/४ चमचा हळद

चवीनुसार मीठ

१ चमचा तेल

आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट

१/२ चमचा पावडर साखर

१ चमचा तेल

मोहरी

हिंग

हिरव्या मिरच्या

कडीपत्ता

ढोकळा बनवण्याची प्रक्रिया :

१.एका भांड्यात बेसन,रवा,दही आणि पाणी घाला सर्वकाही एकत्र मिसळा ते मिश्रण फारच जाड किंवा फारच पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

२.तयार झालेल्या मिश्रणात हळद, इनो/सोडा,चवीनुसार मीठ, तेल आणि आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घाला आणि ते चांगले मिसळा.

३.एक पसरट भांडे घ्या ट्री चा आकराचे त्याला आतील बाजूने हलके तेल लाऊन घ्या त्यात तयार केलेले मिश्रण घाला.

४.आपण प्रेशर कुकर किंवा इडलीचा कुकर मध्ये ते भांडे ठेऊन दया.

५.पाच ते सहा मिनिटानंतर पहा ढोकळा तयात असेल सुमारे १०-१५ मिनिटे पूर्णपणे थंड होऊ द्या.

६.१/२ कटोरी पाणी घ्या एक चिमूटभर मीठ आणि साखर घाला.चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.

७.ढोकळा सुमारे १० मिनिटे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा.

८.ढोकळा वर मीठ आणि साखरेचे पाणी थोडे शिंपडून घ्या ढोकळा जास्त ओला होणार नाही याची काळजी घ्या.

९.ढोकळाला तडका देण्यासाठी पॅन तेल गरम करा.

१०.तेल पुरेसे गरम झाल्यावर मोहरी,कडीपत्ता,हिंग आणि हिरव्या मिरच्या घाला व हा तडका ढोकळा वर घालून घ्या व सर्व्ह करा.

११.आपण जसे आहे तसे ढोकळा घेऊ शकता किवा चिंचेची चटणी किंवा टोमाटो सॉस देखील हे चांगले आहे.

 

हे पण वाचा – 

Leave a Comment