उपमा रेसिपी मराठी | Upma Recipe in Marathi

उपमा रेसिपी मराठी | Upma Recipe in Marathi

Upma Recipe in Marathi: इथे आम्ही उपमा रेसिपी मराठी दिली आहे.इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही घरतील पदार्थ वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमचा उपमा तयार होईल.

उपमा रेसिपी मराठी | Upma Recipe in Marathi

लागणारे साहित्य:

  • १ कप बारिक रवा
  • तूप/तेल
  • शेंगदाणे 
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • बारीक चिरलेला कांदा
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • पाणी
  • चवीनुसार मीठ
  • साखर
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

उपमा बनवण्याची प्रक्रिया | How to make Upma in Marathi

१. कढई गरम करून तूप/तेल घाला आणि त्या मध्ये रवा चांगला मिसळा रवा सुमारे ६-७ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.

२. कढई मध्यम आचेवर गरम करा तेल टाका.त्या मध्ये 

३. मोहरी,जिरे,हिंग,कांदा घाला चांगले मिक्स करावे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता पाने घाला

४. चांगले मिसळा आणि ५-६ मिनिटे शिजवा कांदा मऊ परत होईपर्यंत शिजवा

५. भाजलेला रवा घालून मिक्स करावे. व त्यात हळूहळू गरम पाणी, मीठ आणि साखर घाला.

६. चांगले मिक्स करावे आणि गॅस कमी करा.

७. आपण आपल्या चवनुसार पाण्याचे प्रमाण बदलू शकता.

८. मध्यम आचेवर १/२ मिनिटे झाकून ठेवा आणि शिजवा. 

९. अशा प्रकारे आपला उपमा/उपीट तयार होईल

१०. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर, ताजे किसलेले खोबरे आणि धणे घाला.

 हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment