चकली रेसिपी मराठी | Chakli Recipe in Marathi
Chakli Recipe in Marathi: इथे आम्ही चकली रेसिपी मराठी दिली आहे. इथे आम्ही गव्हाच्या पिठापासून चकली कसी बनवायची याची रेसिपी दिली आहे. हे रेसिपी खाली देलेल्या स्टेप नुसार करा म्हणजे चकली नक्कीच खुसखुसित आणि खमंग होईल.
चकली रेसिपी मराठी | Chakli Recipe in Marathi
लागणारे साहित्य :
१. २ कप गव्हाचे पीठ
२. अर्धा कप तांदळाचे पीठ
३. १ चमचा लाल तिखट
४. १ चमचा हळद
५. १ चमचा पांढरे तीळ
६. १ चमचा धने पूड
७. अर्धा चमचा ओवा
८. मीठ
बनविण्याची प्रक्रिया :
१. कुकरच्या डब्या मध्ये २ कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप तांदळाचा पीठ घ्या.
२. हे मिश्रण चांगले मिसळून घ्या आणि स्टीमर घ्या स्टीमर मध्ये हा डबा ठेवा.
३. स्टीमरमध्ये हा डबा ठेवल्यावर हा डबा सुती कापडाने झाकून ठेवा जेणेकरून स्टीमर च्या वाफेपासून झालेले पाणी त्यात पडणार नाही.
४. त्यांनर झाकून ठेवा आणि मध्यम आचेवर २० मिनिटे वाफऊन घ्या.
५. २० मिनिटे झाल्यावर हा कुकरचे भांडे कडून घ्या आणि पीठ घट्ट झाले असेल ते चमचाने लूज करून घ्या.
६. त्यांनतर एक चाळण घ्या आणि हे पीठ चालून घ्या जर काही गाठी असतील तर त्या फोडून पीठ चाळां.
७. आता या चाळलेल्या मिश्रणात १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा पांढरे तीळ, १ चमचा धने पूड, पाव चमचा ओवा, आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्या.
८. आता हे टाकलेले मसाले चांगले मिसळून घ्या.
९. या नंतर या मध्ये थोडा थोडा पाणी घालून गोळा करून घ्या. गोळा थोडासा घट्ट करून घ्या.
१०. आता सोर्या घ्या यामध्ये चकली ची प्लेट टाका आणि यामध्ये आपण बनवलेलं चकली पिठाचा गोळा टाका.
११. हा गोळा सोर्यामध्ये घट्ट बसेल असा भरा आणि चकल्या पाडून घ्या.
१२. तेल मध्यम गरम करून घ्या आणि त्यात चकल्या टाकून तळून घ्या.
१३. चकल्या तळताना चांगला रंग येई पर्यंत तळा साधारण पणे चांगले तळण्यास ५ ते ६ मिनिटे लागतात. लक्षात घ्या चकली व्यवस्तीत तळ्यावर तेलाच्या तळाला जाऊन बसते.
१४. आत चकल्या तेलातून काढून घ्या आणि आता चकल्या खाण्यास तयार आहेत.
हे पण वाचा –