महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra General Knowledge in Marathi 2024

Table of Contents

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024 | Maharashtra General Knowledge in Marathi

Maharashtra General Knowledge in Marathi: आज या लेखात आपण आपल्या महाराष्ट्रा बद्दलचे सामान्य ज्ञान आपण पाहणार आहोत महाराष्ट्र हा भारताच्या नैऋत्य दिशेस स्थित आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हे भारताचे दुसरे मोठे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे मोठे राज्य आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जी भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे तर या अशाच काही महाराष्ट्रा बद्दलची महत्वाची माहित पाहूयात. 

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी  | Maharashtra Samanya Dnyan 2024

Maharashtra Samanya Dnyan
Maharashtra Samanya Dnyan
  • राज्य – महाराष्ट्र
  • स्थापन दिवस – १ मे १९६० 
  • महाराष्टाचे क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी. (पूर्व – पश्चिम लांबी – ८०० कि.मी. / दक्षिणोत्तर लांबी – ७०० कि.मी.)
  • समुद्र किनारा – ७२० कि.मी. (महाराष्ट्रातील ६ समुद्रकिनाऱ्यालगतचे जिल्हे – ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग)
  • चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
  • हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
  • जंगलाचे प्रमाण – २६.१० %
  • अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.)
  • राष्ट्रीय उद्याने – ताडोबा, चांदोली, गुगामल, संजय गांधी, नवेगाव, पेंच 
  • व्याघ्र प्रकल्प –  मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री , बोर 
  • वनोधाने – चिखलदरा
  • लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार)
  • पुरुष – ५,८३,६१,३९७
  • स्त्री – ५,४०,११,५७५
  • लिंग गुणोत्तर – ९३८
  • लोकसंख्येची घनता – २३७
  • साक्षरता – ८२.५४ %
  • एकूण जिल्हे – ३६
  • प्रशासकीय विभाग –
  • महसूल विभाग –
  • प्रादेशिक विभाग – ५ 
  • जिल्हा परिषद – ३६
  • महानगरपालिका – २९
  • नगरपालिका – २२०
  • तालुके – ३५८
  • ग्रामपंचायती – २७,३९५
  • उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
  • पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
  • मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे 
  • उप-मुख्यमंत्री – देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार 
  • राज्यपाल – रमेश बैस 
  • लोकसभा सदस्य संख्या – ४८ 
  • विधानसभा सदस्य संख्या – २८८
  • विधान परिषद सदस्य संख्या – ७८
  • राज्य वृक्ष – आंबा
  • राज्य फूल – ताम्हण
  • राज्य पक्षी – हरियल
  • राज्य प्राणी – शेकरू 
  • राज्य फुलपाखरु – ब्ल्यू मॉरमॉन 
  • खेळ – कबड्डी
  • प्रमुख नदया – गोदावरी (६६८ किमी), भीमा (४५१ किमी), कृष्णा (२८२ किमी लांबी), वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, तापी
  • भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी
  • प्रमुख लोकनृत्य – लावणी

महाराष्ट्रातील पहिले, लहान, मोठे उंच इत्यादी | Maharashtra Gk in Marathi 2024

महाराष्ट्रातील पहिले, लहान, मोठे उंच इत्यादी.
महाराष्ट्रातील पहिले, लहान, मोठे उंच इत्यादी.
  1. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री: यशवंतराव चव्हाण
  2. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल: श्री प्रकाशा
  3. महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र: मुंबई 1927
  4. महाराष्ट्रातीळ पहिले दूरदर्शन केंद्र: मुंबई,1972
  5. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण: गंगापूर धरण जि. नाशिक, गोदावरी नदी
  6. पहिले पक्षी अभयारण्य: कर्नाळा जि. रायगड
  7. पहिले जलविद्युत केंद्र: खोपोली जि. रायगड
  8. पहिले अनुविद्युत प्रकल्प: तारापूर जि. पालघर
  9. पहिले कृषी विद्यापीठ: राहुरी जि. अहमदनगर
  10. पहिला सहकारी साखर कारखाना: प्रवरानगर 1950 जि. अहमदनगर
  11. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी: इचलकरंजी, जि. कोल्हापूर
  12. पहिला पवन विद्युत प्रकल्प: जामसंडे – देवगड, जि. सिंधुदुर्ग
  13. पहिले उपग्रह दळणवळण केंद्र: आर्वी, जि. पुणे
  14. पहिला लोह पोलाद प्रकल्प: चंद्रपुर
  15. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक: दर्पण १८३२
  16. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र: ज्ञानप्रकाश, 1904
  17. पहिली मुलींची शाळा: पुणे १८४८
  18. पहिली सैनिकी शाळा: सातारा १९६१
  19. पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका: सावित्रीबाई फुले
  20. पहिली कापड गिरणी: मुंबई
  21. पहिले पंचतारांकित हॉटेल: ताजमहाल, मुंबई
  22. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीय व्यक्ती: श्री सुरेंद्र चव्हाण
  23. भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती: धोंडो केशव कर्वे 1958
  24. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती: वि स खांडेकर, 1974
  25. प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले व्यक्ती: आचार्य विनोबा भावे, १९५८
  26. पहिल्या महिला डॉक्टर: आनंदीबाई जोशी
  27. पुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा: वर्धा
  28. पहिली रेल्वे( वाफेचे इंजिन): मुंबई ते ठाणे, 16 एप्रिल १८५३
  29. पहिली दुमजली रेल्वे: सिंहगड एक्सप्रेस – मुंबई ते पुणे
  30. पहिली महिला रेल्वे इंजिन चालक: सुरेखा भोसले, जि. सातारा
  31. पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा: सिंधुदुर्ग
  32. सर्वात मोठी टपाल कचेरी: मुंबई
  33. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा: अहमदनगर
  34. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा: मुंबई शहर
  35. सर्वात उंच शिखर: कळसुबाई शिखर, १६४६ मीटर
  36. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा: रत्नागिरी
  37. सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा: चंद्रपुर
  38. सर्वाधिक पावसाचे ठिकाण: अंबोली, जि. सिंधुदुर्ग
  39. कमी पावसाचा जिल्हा: सोलापूर
  40. महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे: महाराष्ट्र एक्सप्रेस( कोल्हापूर – गोंदिया)
  41. सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा: अहमदनगर
  42. सर्वाधिक लांबीची नदी: गोदावरी
  43. सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा: रेगूर मृदा
  44. पहिली महानगरपालिका: मुंबई
  45. सर्वात मोठी लाकूड पेठ: बल्लारपूर, जि. चंद्रपूर
  46. प्रसिद्ध ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला मराठी चित्रपट: श्वास, 2004
  47. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा: मुंबई शहर
  48. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
  49. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा: ठाणे
  50. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा: सिंधुदुर्ग
  51. स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त असणारा महाराष्ट्रातील जिल्हा: रत्नागिरी
  52. स्त्रियांचे प्रमाण सर्वात कमी असणारा महाराष्ट्रातील जिल्हा: मुंबई शहर
  53. महाराष्ट्रातील पहिले मासिक: दिग्दर्शन (1840)
  54. महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र: ज्ञानप्रकाश
  55. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा: सिंधुदुर्ग
  56. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प: जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे | Maharashtratil Thand Havechi Thikane

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
  1. रायगड: माथेरान
  2. औरंगाबाद: म्हैसमाळ
  3. सातारा: महाबळेश्वर, पाचगणी 
  4. सिंधुदुर्ग: अंबोली
  5. नंदुरबार: तोरणमाळ
  6. कोल्हापूर: पन्हाळा
  7. अहमदनगर: भंडारदरा
  8. अमरावती: चिखलदरा
  9. पुणे: लोणावळा, खंडाळा

Opposite Words In Marathi


महाराष्ट्रातील प्रमुख घाट रस्ते / महामार्ग | Maharashtratil Ghat and highways in Marathi

  1. थळ घाट / कसारा: मुंबई ते नाशिक
  2. माळशेज घाट: ठाणे ते अहमदनगर
  3. दिवा घाट :पुणे ते बारामती
  4. खंडाळा / बोर घाट: मुंबई ते पुणे
  5. खंबाटकी घाट: पुणे ते सातारा
  6. पसरणी घाट : वाई ते महाबळेश्वर
  7. आंबा घाट: कोल्हापूर ते रत्नागिरी
  8. कुंभार्ली घाट: कराड ते चिपळूण
  9. फोंडा घाट: कोल्हापूर ते पणजी

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे | Maharashtratil Jyotirlinga chi nave

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे
  1. भीमाशंकर: पुणे
  2. परळी वैजनाथ: बीड
  3. त्र्यंबकेश्वर: नाशिक
  4. घृष्णेश्वर: औरंगाबाद
  5. औंढा नागनाथ: हिंगोली
  6. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे
  7. रेणुका देवी: माहूर, जिल्हा नांदेड
  8. तुळजाभवानी: तुळजापूर जिल्हा धाराशिव 
  9. सप्तशृंगी देवी: वणी, जिल्हा नाशिक
  10. अंबाबाई: कोल्हापूर

 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे । Top Tourist Places in Maharashtra

in Marathi

 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे 
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
  • अजिंठा लेणी
  • एलोरा लेणी
  • एलिफंटा लेणी
  • गेट वे ऑफ इंडिया
  • छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे
  • बीबी का मकबरा
  • कैलास मंदिर
  • आगा खान पॅलेस
  • लोणार सरोवर
  • हँगिंग गार्डन
  • महाबळेश्वर
  • शिर्डी
  • कोंकण समुद्रकिनारा

महाराष्ट्रातील नद्या व प्रमुख धरणे । Important Rivers of Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील नद्या व प्रमुख धरणे
महाराष्ट्रातील नद्या व प्रमुख धरणे
  1. वैतरणा: मोडकसागर ठाणे
  2. पेंच: तोतलाडोह नागपूर
  3. गोदावरी: गंगापूर नाशिक
  4. गिरणा: चानकपूर, पांझण, नाशिक
  5. प्रवरा: भंडारदरा,अहमदनगर
  6. गोदावरी: जायकवाडी, औरंगाबाद
  7. भोगावती: राधानगरी कोल्हापूर
  8. गाढवी: इटियाडोह गोंदिया
  9. बाघ: सिरपूर गोंदिया
  10. भीमा: उजनी, सोलापूर
  11. अडाण: अडाण, वाशीम
  12. नळगंगा: नळगंगा, बुलढाणा
  13. दक्षिणा-पूर्णा : येलदरी, हिंगोली
  14. दक्षिणा-पूर्णा : सिद्धेश्वर, हिंगोली
  15. दीना: दीना, गडचिरोली
  16. खोबरागडी: तुलतुली, गडचिरोली
  17. दारणा: दारणा, नाशिक
  18. मुठा: खडकवासला, पुणे
  19. मुळा : मुळशी, पुणे
  20. वेळवंडी: भाटघर, पुणे
  21. अंबी: पानशेत, पुणे
  22. बिंदुसरा: बिंदुसरा, बीड
  23. सिंदफणा: माजलगाव, बीड
  24. कोयना: कोयना, सातारा
  25. कृष्णा: धोम खोडशी, सातारा

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था | Agricultural Research Institute in Maharashtra

कृषी संशोधन संस्था स्थान
काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र डिग्रज (सांगली)
सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र राजगुरूनगर (पुणे)
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र भाटये (रत्नागिरी)

 


महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व जिल्हे | Maharashtratil khanij sampatti

खनिज संशोधन केंद्र स्थान
मॅग्नीज सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
तांबे चंद्रपूर, नागपूर
चुनखडी यवतमाळ
दगडी कोळसा सावनेर, कामठी, गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर), उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ)
बॉक्साईट कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड रेड्डी (सिंधुदुर्ग)
डोलोमाईट रत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाई भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईट देहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त नागपूर

 


महाराष्ट्रातील गणपतींची नावे व स्थळ

गणपतीचे नाव स्थान
श्री चिंतामणी थेऊर, पुणे
श्री वरदविनायक महड, रायगड
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक, अहमदनगर
श्री मोरेश्वर मोरगाव, पुणे
श्री गिरिजात्मक लेण्याद्री, पुणे
श्री महागणपती रांजणगाव, पुणे
श्री विघ्नहर्ता ओझर, पुणे

 


महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra GK Question in Marathi 2024

Q. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत?

उत्तर: दरेकसा टेकड्या

Q. महाराष्ट्रातील……… जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात?

उत्तर: नागपूर व गोंदिया

Q. महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत यापैकी मराठवाड्यात किती आहेत?

उत्तर: 3

Q. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत?

उत्तर: ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरीवली

Q. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांची संबंधित आहे?

उत्तर: संत गोरोबा काका

Q. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते?

उत्तर: नंदुरबार

Q. ‘मराठी भाषेचे जॉन्सन’ कोणाला म्हणतात?

उत्तर: कृष्णशास्त्री चिपळूणकर

Q. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे?

उत्तर: ठाणे

Q. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

उत्तर: मुंबई

Q. जगप्रसिद्ध भुचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे?

उत्तर: अलिबाग

Q. ‘महाराष्ट्र सेवा हमी कायदा’ केव्हा लागू झाला?

उत्तर: 2015

महाराष्ट्र सामान्यज्ञान प्रश्न | GK Questions on Maharashtra in Marathi

Q. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

उत्तर: नाशिक

Q. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर: १७ सप्टेंबर

Q. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे?

उत्तर: ठाणे

Q. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ कोणते आहे?

उत्तर: वणी

Q. खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

उत्तर: पुणे – कोल्हापूर

Q. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?

उत्तर: वैनगंगा नदी

Q. “कळसूबाई? हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: अहमदनगर

Q. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते?

उत्तर: गडचिरोली

Q. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालाईलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर: चंद्रपुर

Q. ‘खानदेशीची कवयित्री’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर: बहिणाबाई चौधरी

Q. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर: आत्माराम पांडुरंग

हे पण वाचा –

Maharashtra District Court Peon Question paper in Marathi

Online general knowledge test in Marathi

अर्ज कसा लिहावा मराठी

नोकरी अर्ज नमुना

General Knowledge PDF Marathi Download

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

2 thoughts on “महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra General Knowledge in Marathi 2024”

Leave a Comment