आज या लेखात आपण जगातील सात आश्चर्य काय आहेत व ते कुठे आहेत बऱ्याच लोकांना या बद्दल माहिती नाही खास करून लहान मुलांना ही माहिती मिळावी यासाठी आम्ही आजचा लेख घेऊन आलो आहोत.
१. रोमन कोलोजियम
रोमन कोलोजियम इटली देशातील रोम शहरा मध्ये स्थित आहे. हे एक विशाल स्टेडियम आकाराचे आहे जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई, कुस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन केले जायचे असे म्हंटले जाते याचे निर्माण त्याकाळातील शासक वेस्पियन ने 70 ते 72 ईसा पूर्व केले होते.
२. चीनची भिंत
चीनची भिंत जगभरात म्हणून ओळखली जाते. या भिंतीचे निर्माण 7 ते 16 व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आली आहे असे म्हंटले. या भव्य भिंतीच्या निर्माणासाठी माती, दगड, विटा, लाकूड इत्यादींचा वापर करण्यात आला होता. उत्तरेकडील आक्रमणकारी रोखण्याकरिता चीनमधील वेगवेगळ्या राज्यांच्या शासका द्वारे या भिंतीचे निर्माण करण्यात आले होते.
३. चीचेन इत्जा
जगातील सात आश्चर्य मध्ये चीचेन इत्जा या मेक्सिकोमधील अती प्राचीन आणि विश्व प्रसिद्ध मयान मंदिराचा समावेश आहे. याचे निर्माण 600 ईसा पूर्व करण्यात आले होते.
४. माचू पिचू
माचू पिचू दक्षिण अमेरिका च्या पेरू मध्ये स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर एका उंच व लहान टेकडीवर स्थित आहे. समुद्र तळापासून 2430 मीटर उंचीवर असलेल्या माचू पिचू शहरात 15 शतकात इंका जातीचे लोक राहायचे.
५. ख्रिस्त द रिडीमर
ख्रिस्त द रिडीमर म्हणून ओळखले जाणारे हे आश्चर्य परमेश्वर येशू ख्रिस्त यांची एक प्रतिमा आहे. जगातील सात आश्चर्य मध्ये असलेली ही प्रतिमा जगातील सर्वाधिक उंचीच्या प्रतिमामध्ये सामील आहे. ब्राझील देशातील रिओ दी जनेरिओ या शहरात स्थापित असलेली येशू ख्रिस्ताची प्रतिमा 38 मीटर उंच व 30 मीटर रुंद आहे.
६. ताज महल
भारताची शान असलेले ताजमहल आग्रा शहरात स्थित आहे. ताजमहाल ला जगातील सात आश्चर्यामध्ये सामील करण्यात आलेले आहे. ताजमहालचे निर्माण मोगल बादशहा शहाजहान याने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या आठवणीत इसवी सन 1632 मध्ये बनवले होते. ताजमहल पांढऱ्या संगमरवर पासून बनवलेले एक महाल आहे.
७. पेट्रा
पेट्रा दक्षिण जॉर्डन मध्ये स्थित एक इतिहासिक नगर आहे. आपल्या अद्भुत कलाकृतींमुळे हे शहर जगातील सात आश्चर्यांमध्ये सामील आहे. या शहरात मोठमोठी चट्टान कापून त्यांच्यापासून कलाकृती बनवण्यात आल्या आहेत. या शहराला रोज (गुलाब) सिटी देखील म्हटले जाते. कारण येथील कापलेले सर्व दगड लाल रंगाचे आहेत.
हे पण वाचा –