PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम | PSI Pre Exam Syllabus in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला PSI(Police Sub-Inspector) पूर्व परीक्षा अभ्यासक्रम मराठी मध्ये संजावून सांगितलं आहे. तसेच  इथे आम्ही पूर्व, मुख्य परीक्षा, मुलाखत तसेच शारीरिक चाचणी संबंधी संपूर्ण माहिती मराठीतून दिली आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

सर्वात आधी आपण PSI Meaning in Marathi जाणून घेऊयात.

PSI Full Form in MPSC – POLICE SUB INSPECTOR किंवा पोलीस उपनिरीक्षक असा होतो

PSI Syllabus Maharashtra

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा खालील टप्यात होते 

  1. पूर्व परीक्षा – १०० गुण
  2. मुख्य परीक्षा – ४०० गुण
  3. शारीरिक चाचणी – १०० गुण
  4. मुलाखत – ४० गुण

PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम | PSI Pre Exam Syllabus in Marathi

MPSC PSI Syllabus in Marathi | PSI Syllabus MPSC

१. पूर्व परीक्षा – १०० गुण 

पूर्व परीक्षेत एक पेपर असतो या पेपर ला सामान्य क्षमता चाचणी असे म्हणतात याचा पेपर खालील प्रमाणे असतो.PSI Syllabus MPSC

 

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम –

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन.

३.  इतिहास – आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

४.  भूगोल – (विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग ) हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

५. अर्थव्यवस्था

५.१ भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग ,लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.

५.२ शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी.

६. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र.

७. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित

७.१ बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

७.२ अंकगणित – बेरीज ,वजाबाकी , गुणाकार ,भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम | PSI Main Exam Syllabus in Marathi

२. मुख्य परीक्षा – ४०० गुण

मुख्य परीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते व यामध्ये पेपर-१ आणि पेपर-२ असतात आणखी माहिती खालील प्रमाणे

PSI Syllabus MPSC

पेपर – १ : मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये मध्ये खालील घटकांचा समावेश असेल

१. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उता-यावरील प्रश्नांची उत्तरे.

२. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage.

३. सामान्य ज्ञान –

३. १. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

३. २. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५

३. ३. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवकाँग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर – २ : सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान मध्ये खालील घटकांचा समावेश असेल

१. बुध्दिमत्ता चाचणी

२. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान(Climate), पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकिय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.

३. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.

४. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

५. मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

६. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (Maharashtra Police Act)

७. भारतीय दंड संहिता, १८६० (Indian Penal Code)

८. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (Criminal Procedure Code)

९. भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ ( Indian Evidence Act.)

३. शारीरिक चाचणी – १०० गुण 

शारीरिक चाचणीसाठी खालील शारीरिक पात्रता आवश्यक आहे

पुरुष उमदेवारांसाठी

उंची – कमीत कमी १६५ सेंटीमीटर

छाती – कमीत कमी ७९ सेंटीमीटर व छाती ५ सेंटीमीटर फुगली पाहिजे, म्हणजे जर तुमची छाती ७९ सेंटीमीटर असेल तर फुगवल्यावर कमिटी कमी ८४ सेंटीमीटर व्हायला पाहिजे.

महिला उमदेवारांसाठी

उंची – कमीत कमी १५७ सेंटीमीटर

शारीरिक चाचणी मध्ये खालील घटक असतील 

पुरुष उमदेवारांसाठी 

गोळाफेक ( गोळा ७. २६० किलो ग्रॅ ) – १५ मार्क

पुलअप्स – २० मार्क

लांबउडी – १५ मार्क

धावणे ( ८०० मीटर ) – ५० मार्क

महिला उमदेवारांसाठी 

गोळाफेक ( गोळा ४ किलो ग्रॅ ) – २० मार्क

धावणे ( २०० मीटर ) – ४० मार्क

चालणे ( ३ कि मी ) – ४० मार्क

४. मुलाखत

४० गुण ( ज्यांना शारिरीक परिक्षेत ५० पेक्षा जास्त मार्क असतील तेच उमेदवार मलाखतीसाठी पाञ आहेत)

Conculsion

तर मित्रांनो मला अशा आहे PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम या लेखात दिलेली पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. PSI किव्हा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षेसाठी चालू घडामोडी संबंधी भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे. परीक्षेला जाण्यापूर्वी मागील २-३ महिन्यात जे काही राज्यात, भारतात आणि जगात घडत आहे त्यासंबंधी एकदा सर्व वाचून नक्की जा. चालू घडामोडी संबंधी रेगुलर अपडेट्स साठी तुम्ही या youtube channel ला फॉलो करू शकता.

हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment