आर्मी भरती कागदपत्रे | Army Recruitment Documents in Marathi

आज या लेखात आपण आर्मी भरती साठी जी कागदपत्रे लागतात ते पाहणार आहोत. आर्मी भरतीची जाहिरात येते तेव्हा त्या ठिकाणी ही काय कागदपत्रे लागतील ते सांगितलेले असते परंतु आपण आर्मी भरतीची तयारी करत असताना आपली कागदपत्रे तयार हवीत जेणे करून आपल्याला ऐन वेळेस आपली धावपळ होणार नाही येथे आम्ही काही कागदपत्रे सांगितली आहेत त्यानुसार कागदपत्रे तयार ठेवावीत परंतु जाहिरात आल्यानंतर काही कागदपत्रे मिळवण्यासाठी खूप वेळ जातो तो वेळ तुमचा वाया जाऊ नये म्हणून आवश्यक असलेले कागदपत्र खालील प्रमाणे दिली आहेत.

Army Recruitment Documents in Marathi

 

आर्मी भरती कागदपत्रे | Army Recruitment Documents in Marathi

 
  • आर्मी भरतीतील आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे 

 

1. इयत्ता 10 वी चे बोर्ड सर्टिफिकेट (ज्यावर तुमची जन्म तारीख असते)

 

2. सरपंच/तलाठी यांचा रहिवासी दाखला

 

3. सरपंच/तलाठी यांचा वर्तणुकीचा दाखला

 

4. शाळा सोडल्याचा दाखला (असल्यास, अन्यथा बोनफाईड सर्टिफिकेट)

 

5. जातीचा दाखला (जातीवर आधारित आरक्षण सैन्यात नाही)

 

6. पासपोर्ट साईझ फोटो 20/25 प्रती

 

7. शैक्षणिक पात्रतेचे सर्व प्रमाणपत्र  (10,12 वी मार्कलिस्ट)

 

8. कॉम्प्युटर प्रमाणपत्र (असल्यास)

 

9. ITI प्रमाणपत्र (असल्यास)

 

10.माजी सैनिक – (माजी सैनिक जागा राखीव असतात जे विद्यार्थी माजी सैनिक कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना माजी सैनिक प्रमाणपञ आवश्यक आहे)

 

11.वाहन परवाना – ( वाहन परवाना हा ज्या विद्यार्थांनी ड्रायवर पदासाठी अर्ज केलेत त्यांना लागते. तसेच हा परवाना हलके चारचाकी वाहन (LMV -TR) या गटातील पाहिजे.)

 

12.खेळाडू असल्यास त्याचे प्रमाणपत्र जिल्हा पातळी पासून पुढील

 

13. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, (या पैकी एक असणे बंधनकारक )

 

14. डोमासाईल सर्टिफिकेट (नवीन चालू वर्षीचे)

 

15. डोंगरी दाखला ( डोंगरी भागातील रहिवासी असल्यास डोंगरी दाखला तहसीलदार यांच्याकडील )

 

[ टीप ;- आर्मीतील पदांनुसार कागदपत्राची पुर्तता करणे अनिवार्य असते परंतु सर्व पदांनसाठी किमान आवश्यक कागदपत्रे लागतात ती आम्ही इथे दिली आहेत. ]

 

पडताळणी साठी जाता वरील कागदपञाच्या मुळपञी आणि झेराॅक्स चे दोन सेट घेऊन जावे. तसेच एखादे प्रमाणपञ नसल्यास काळजी करू नये तुमची जर निवड झाली तर त्या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला वेळ दिला जातो त्यावेळेत ते प्रमाणपञ सादर करावे.

 

हे पण वाचा –

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment