आधार कार्ड अपडेट करणे | Updating Aadhar Card in Marathi

आधार कार्ड अपडेट करणे | Updating Aadhar Card in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण आधार कार्ड कसे update कसे करायचे हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला आपण आधार बनवताना अनेकदा असे होते की तुम्ही दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुम्ही विसरता किंवा आधार कार्ड बनवताना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील नोंदवायला आपण विसरतो किंवा आपला पत्ताच कुठेतरी चुकीचा टाकतो, असे हि आपल्याला पाहायला मिळते. आधार कार्ड उपडेट करणे फार महत्वाचे आहे कारण ते  भारत सरकारच्या आधारकार्ड डेटाबेस मध्ये राहील. त्याचबरोबर पत्ता उपडेट केल्यास अनेक आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा सेवा देखील आपल्याला सहज मिळू शकतात.

आजच्या काळात, पत्ता बदलण्यापासून ते ऑनलाइन ओपीडीची अपॉइंटमेंट घेण्यापर्यंत आणि आधारची आयटीआर पडताळणीच्या माध्यमातून करता येईल परंतु तुमच्याकडे असलेला मोबाईल नंबर आधारशी जोडलेलाअसला पाहिजे. UIDAI, आधार लिंक्ड सेवा प्रदाता, आधार कार्ड धारकांना ईमेल/मोबाइल नंबर सत्यापित करण्याची सुविधा प्रदान करते. UIDAI याच्या मदतीने तुमचा मोबाईल नंबर/ईमेल UIDAI च्या डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. हे सत्यापित करण्याचा एक सोपा मार्ग आहे.

आधार कार्ड अपडेट करणे | Updating Aadhar Card in Marathi

 

  • आधार कार्ड मध्ये तुमचा पत्ता कसा अपडेट करायचा

1. सर्वात प्रथम तुम्ही गुगल वर UIDAI सर्च करा नंतर UIDAI वेबसाइट वर जाऊन पुढील वेबसाईट ओपन करा.  https://uidai.gov.in/

2. या वेबसाईट वर गेल्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाषा निवडा. नंतर पुढे तुम्हाला My Aadhaar असे एक बटन दिसू लागेल त्यावर क्लिक करा.

3. नंतर Update Your Aadhaar या क्लिक करा.  केल्या नंतर नवीन टॅबवर जा आणि ड्रॉपडाउनमधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करा.

4. त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज दिसू लागेल.

5. येथे खाली गेल्यावर, Proceed to Update Address या बटन वर क्लिक करा.

6. त्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.

7. या पेजवर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन टाका आणि खाली Send OTP या बटनवर क्लिक करा.

8. आता तुमच्या आधार नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP नंबर येईल.

9. तो OTP त्या चौकटीत टाका.

10. ते एंटर केल्यानंतर, तुम्हाला डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करावे लागेल.

11. यानंतर ॲड्रेस ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा पत्ता बदला गेला असेल.

12. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड मधील पत्ता उपडेट होईल.

मला अशा आहे Updating Aadhar Card in Marathi या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन आधार कार्ड डिटेल्स update कसे करता येईल, याबाबत माहिती मिळाली असेल. तरी सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment

स्पर्धा परीक्षा व्हाट्सअप ग्रुप