भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi

विद्यार्थी मिंत्रानो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी / Bhrashtachar Essay in Marathi हा निबंध पाहणार आहोत. आम्ही भ्रष्टाचार निबंध मराठी अत्यंत सध्या आणि सहज समजेल अश्या भाषेत दिला आहे जेणे करून तुम्हला लगेच समजेल.

भारत हा दिवसेन दिवस एक समृद्ध राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे परंतु आजही आपल्या समोर खूप मोठ्या समस्या आहेत जसे कि वाढती लोकसंख्या, बेरोजगारी व भ्रष्टाचार हि आपल्या समोरची सर्वात मोठी आव्हाने आहेत.

अगदी सरकारी शिपाया पासून ते मोठं मोठया राजकीय नेत्या पर्यंत सगळेच भ्रष्टाचाराला खत पाणी घालत असतात आज भारतात कुठे कसलेही काम असेल तर आधी चिरीमिरी दिल्याशिवाय आपले काम होत नाही आणि महत्वाचे म्हणजे कुणालाच त्यात काही वावघे वाटत नाही. पण काळत नकळत आपणच भ्रष्टाचाराला बढावा देत असतो भ्रष्टाचाराची सुरुवात कुठून झाली हे कुणीही सांगू शकत नाही पण हे खरं आहे की जसजसा माणसाकडे पैसे येऊ लागला तसा माणूस चैनीचा व दिखाव्याचा गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला व त्याच्या गरजा वाढायला लागल्या व त्याला पैसा कमी पडू लागला त्यामुळे माणूस हा भ्रष्टाचाराकडे वळू लागला आहे.

जसजशी सुधारणा होऊ लागल्या तशा चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या व गरज नसतानाही त्या हव्या हव्याशा वाटू लागल्या माणसाला लोभ वाढू लागला जास्त मेहनत न करता अधिक अधिक संपत्ती मिळवायचा लोभ वाढू लागला हि हावच मूळ म्हणजे भ्रष्टाचार आहे.

आपल्या पदाचा, अधिकाराचा गैर वापर करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा त्या मागचा मानस असतो सामान्य माणूस सुद्धा त्यामागचा तेवढाच गुन्हेगार असतो सामान्य माणूस लाच देतो म्हणूनच समोरचा माणूस घेतो किती सहज आपण तो गुन्हा करतो.

किती वेळा आपण पाहतो कि आपल्याला नाक्या वर पोलीस पकडतात तेव्हा आपण सर्वजण त्याच्या हातावर पन्नास शंभर रुपये टेकवून आपण निघून जातो सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखोंची लाच दिली जाते. शाळेत कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी लाच दिली जाते.

एवढच नव्हे तर आपण देवळात सुद्धा लवकर दर्शन व्हावे म्हणून पुजाऱ्याला पैसे देतो. पटत असेल का हे देवाला किती वेळा आपण पैसे देऊन उच्च पद मिळवतो. निवडणुकांमध्ये पैसे वाटून मत विकत घेतली जातात. नंतर जेव्हा असे लोक निवडून येतात तेव्हा कित्येक पटीने हि लोक पैसे आपले वसूल करतात.

आपले प्रत्येक काम करताना त्यांना पैसे द्यावे लागतात का हे आपल्याला आधी कळत नाही आपण डोळ्यावर बक्षिसांची पट्टी बांधून गप्प राहतो आणि आपण कोणालाही निवडून देतो आणि भारतातल्या सिस्टिमला नावे ठेवत बसतो आपण आपली चूक हि कधीच मान्य का करत नाही.

 
भ्रष्टाचार निबंध मराठी

 

आपण सर्वांना कळायला पाहिजे कि भ्रष्टाचार करून पुढे जाता येईल पण अशी भ्रष्टाचार केलेली संपत्ती काही कामाची नाही या उलट इमानदारीने कमावलेले खूप कामाचे असतात व त्याच्यात खूप समाधान सुद्धा असते आपल्या सर्वाना हे कळत असेलही आपण कधी ना कधी भ्रष्टाचाराला खत पाणी घातले असेल कधी कधी तर असे होते कि आपल्यामुळे एकदा इमानदार अधिकाऱ्याला लाच घ्यायची सवय लागून जाते आणि तो या चक्रविव्हात अडकतो आणि त्याला पुढे त्याचा नफा दिसू लागतो.

आपल्या भारताची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर सर्वानी प्रतिज्ञा करायला हवी मला कितीहि त्रास झाला कामाला कितीहि वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही.

पण आता थोडेसे चित्र बदलताना दिसत आहे कारण भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी पासून सर्वसामान्य माणसापर्यंत नुकसान होत आहे हे लोकांना कळले आहे. आजकाल विद्यार्थी सुद्धा परीक्षेत होणारा भ्रष्टाचारा उघडकीस आणत आहेत. तसेच सरकार पण यावर कारवाही करते आहे पण त्याला वेळ लागतोय. तसेच अनेक चित्रपटातून भ्रष्टाचाराची जनजागृती होताना दिसते.

पण हे पुरेसे नाही आता कुठे सुरुवात आहे आपल्याला या चळवळीला खूप पुढे न्यायाचे आहे. कारण आता सुरु होऊ पाहणारी हि चळवळ बंद होता काम नये आणि जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत भाग घेऊन भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न केले तर भारतातून लवकरच भ्रष्टाचाराचा राक्षस नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

भ्रष्टाचारावर 10 लाइन मध्ये निबंध

Bhrashtachar Essay in Marathi

१) भ्रष्टाचार हे नफा कमावण्याचे अनैतिक आणि अयोग्य साधन आहे.
२) एका सर्वेक्षणानुसार,92% भारतीयांनी त्यांच्या आयुष्यात एक वेळा तरी सरकारी अधिकाऱ्याला काम पूर्ण करून देण्यासाठी लाच दिली आहे.
३) देशाच्या समान विकासाच्या मार्गावर भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे.
४) 2017 मध्ये फोर्ब्सने आशियातील 5 सर्वात भ्रष्ट देशांमध्ये 69% लाचखोरी दरासह प्रथम स्थान मिळविले आहे.
५) भारत भ्रष्टाचार प्रणाली प्रत्येक स्तरावर आहे, मग ते सार्वजनिक क्षेत्र असो की खासगी क्षेत्र असो.
६) भ्रष्टाचार सरकारच्या योजनांचा आणि इतर फायद्यांचा मोठा भाग शोषून घेतो आणि त्यामुळे लाभार्थीपर्यंत ती रक्कम फारच कमी पोहोचते.
७) प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी माहितीचा अधिकार हा एक उत्तम साधन आहे.
८) अनेक निवडून आलेल्या खासदार किंवा आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत; तरीही ते निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत.
९) जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, गरीब लोकांसाठी निश्चित केलेले फक्त 40%च धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचते.
१०) जोपर्यंत आपण भ्रष्टाचाराविरूद्ध कठोर पावले उचलत नाही तोपर्यंत आपण भारतातून भ्रष्टाचार दूर करू शकत नाही.

भ्रष्टाचार विरोधी दिन

जगभरातील भ्रष्टाचाराविरूद्ध लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी आणि संपूर्ण जगाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी ‘भ्रष्टाचार विरोधी दिवस’ 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करीत, सर्व सरकार, खाजगी, स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्था भ्रष्टाचाराविरूद्ध एकत्र लढवण्याचे वचन देतात. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 31 ऑक्टोबर 2003 रोजी एक ठराव मंजूर केला आणि ‘अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस यूएनजीएने दरवर्षी 9 डिसेंबरला दिवस साजरा करण्यासाठी घोषित केला होता. भ्रष्टाचाराविरूद्ध या युद्धामध्ये सर्वजण एकत्र होत आहे, त्यामुळे हि गोष्ट पूर्ण राष्ट्रासाठी शुभ संकेतच मानायला पाहिजे. कारण भ्रष्टाचार हि फक्त एका देशाची समस्या नसून संपूर्ण जगाची समस्या बनत चालली आहे.

भ्रष्टाचाराची कारणे

देशाचा लवचिक कायदा – भ्रष्टाचार ही कुठल्याही विकसनशील देशाची समस्या बनली आहे, भ्रष्टाचाराचे मुख्य कारण म्हणजे देशाचा लवचिक कायदा कारण बहुतेक भ्रष्टाचार केलेली माणसे किव्हा नेते पैशाच्या आधारे निर्दोष मुक्त होऊन जातात ज्यामुळे गुन्हेगाराला शिक्षेची भीती वाटत नाही.

एखाद्या व्यक्तीचा लोभी स्वभाव – लोभ आणि असंतोष हा एक विकार आहे जो व्यक्तीला अजून खालच्या पातळीवर जायला भाग पाडते आणि त्या व्यक्तीची लोभ दिवसेंदिवस वाढतच जाते.

सवय – सवयीचा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप मोठा परिणाम होतो. सेवानिवृत्तीनंतरही एका लष्करी सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आपल्या प्रशिक्षणादरम्यान मिळालेली शिस्त त्याच्या आयुष्यात कायम ठेवतो. त्याचप्रमाणे, आपल्या भारत देशात भ्रष्टाचारामुळे लोकांना corruption करायची सवय झाली आहे.

मानसा – एखाद्या व्यक्तीने निश्चित केले तर कोणतेही काम करणे अशक्य नाही, त्याच प्रकारे, भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मनसा आहे.

एखाद्या राष्ट्राच्या विकासामध्ये आणि आपल्या लोकांच्या कल्याणात भ्रष्टाचार हा बहुधा खूप मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचार हे केवळ आता एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित नाही कारण त्यात सरकारी कार्यालये, विभाग, ग्रामपंचायती, पोलीस खाते इत्यादी विस्तृत श्रेणीचा समावेश आहे. लोकांना आता त्याच्या चुकीची जाणीव करून कठोर कायद्यांची अंमलबजावणी करून भ्रष्टाचाराला आळा घालता जाऊ शकतो.

तुम्हाला मी लिहलेला Bhrashtachar Essay in Marathi कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा.

 
हे पण वाचा – 

Leave a Comment