महाराष्ट्र प्रशासकीय विभाग | Maharashtra division full information in Marathi

महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या ज्या भागांमध्ये विभागल्या गेला आहे ते प्रादेशिक विभाग म्हणजे कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ.होय.या भौगोलिक विभागाच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची सहा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. तर पाच प्रादेशिक विभागात विभागणी केली आहे. प्रादेशिक विभागाचा विचार केला तर विदर्भात अमरावती व नागपूर असे दोन प्रशासकीय विभाग, मराठवाड्यात औरंगाबाद हा एक तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोंकणसाठी मुंबई असे प्रशासकिय विभाग आहेत.ही विभागणी सर्वसाधारण असून शासनात असलेल्या इतर विभागांनी आपपल्या कामकाजाचा विचार करून वेगळी विभागणी सुद्धा केलेली आहे.महाराष्ट्रा मध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत ते खालील प्रमाणे

Maharashtra division full information in Marathi

 

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग | Maharashtra division full information in Marathi

१. कोकण प्रशासकीय विभाग 

भौगोलिक विभागाचे नाव – कोकण

मुख्यालय – मुंबई

जिल्ह्यांची संख्या – ७

जिल्ह्यांची नावे – मुंबई शहर, उपनगर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर

क्षेत्रफळ – ३०,७४६ चौ.कि.मी.²

लोकसंख्या – २,८६,३८,३९७

साक्षरता – ८२.३६%

 

२. पुणे प्रशासकीय विभाग 

भौगोलिक विभागाचे नाव – पश्चिम महाराष्ट्र

मुख्यालय – पुणे

जिल्ह्यांची संख्या – ५

जिल्ह्यांची नावे – पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर

क्षेत्रफळ – ५८,२६८ चौ.कि.मी.²

लोकसंख्या – ९९,७३,७६२

साक्षरता – ७९.९५%

 

३. नागपूर प्रशासकीय विभाग 

भौगोलिक विभागाचे नाव – विदर्भ

मुख्यालय – नागपूर

जिल्ह्यांची संख्या – ६

जिल्ह्यांची नावे – भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, 

क्षेत्रफळ – ५१,३३६ चौ.कि.मी.²

लोकसंख्या – १,०६,६६,८३१

साक्षरता – ७५.९०%

 

४. अमरावती प्रशासकीय विभाग 

भौगोलिक विभागाचे नाव – विदर्भ

मुख्यालय – अमरावती

जिल्ह्यांची संख्या – ५ 

जिल्ह्यांची नावे – अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ,

क्षेत्रफळ –  ४६,०९० चौ.कि.मी.²

लोकसंख्या – ३९,४०,९९३

साक्षरता – ७७.७८%

 

५. औरंगाबाद प्रशासकीय विभाग 

भौगोलिक विभागाचे नाव – मराठवाडा

मुख्यालय – औरंगाबाद

जिल्ह्यांची संख्या – ८ 

जिल्ह्यांची नावे – औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना,

क्षेत्रफळ – ६४,८११ चौ.कि.मी.²

लोकसंख्या – १,५५,८८,१२३

साक्षरता – ६९.९६%

 

६. नाशिक प्रशासकीय विभाग 

भौगोलिक विभागाचे नाव – खानदेश

मुख्यालय – नाशिक

जिल्ह्यांची संख्या – ५ 

जिल्ह्यांची नावे – नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, धुळे, 

क्षेत्रफळ – ५७,२६८ चौ.कि.मी.²

लोकसंख्या – १,५७,७५,१६४

साक्षरता –  ७२.१२%

Leave a Comment