गाजलेले मराठी चित्रपट | Famous Marathi movies in marathi
महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित आहे की भारतीय चित्रपट श्रुष्टीचे जनक दादासाहेब फाळके आहेत.ज्यांनी भारतामध्ये पाहिल्यादा चित्रपट निर्मीतीची सुरुवात केली होती महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपट श्रुष्टी ही पूर्वी पासून खूप मनोरंजक आणि गाजलेली चित्रपट श्रुष्टी आहे महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने हे चित्रपट पहिलेच पाहिजेत या अशाच काही गाजलेले चित्रपट आपण पाहूयात.
गाजलेले मराठी चित्रपट | Famous Marathi movies in marathi
१.सैराट
सैराट हा चित्रपट महाराष्ट्र बहुतेक लोकांनी पाहिलेला आहे. या चित्रपटला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता या चित्रपटाची कमाईने मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये इतिहास घडवला आणि रेकॉर्ड ब्रेअक कमाई केली जी मराठी चित्रपटाचा कधीही झालेली नव्हती.
दिग्दर्शक – नागराज मंजुळे
प्रदर्शित – २०१६
कलाकार – रिंकू राजगुरू, आकाश ठोसर
२.टाईमपास
अतिशय उत्तम लव स्टोरी रवी जाधव यांनी या चित्रपटा मध्ये मांडलेली आहे. या चित्रपटला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.आणि भरभरून प्रेम दिले.
दिग्दर्शक – रवी जाधव
प्रदर्शित – २०१४
कलाकार – केतकी माटेगावकर, प्रथमेश परब
३.दुनियादारी
संजय जाधव यांची ही एक उत्कृष्ट कृती होती. मैत्री आणि प्रेमाची ही कहाणी मराठी सिनेमा मध्ये सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.
दिग्दर्शक – संजय जाधव
प्रदर्शित – २०१६
कलाकार – स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारी
४.नटसम्राट
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’मध्ये नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट ‘कुसुमाग्रज’ नाटकाचे रूपांतर आहे. हा चित्रपट सर्वात अपेक्षित रिलीज होता आणि मराठी चित्रपट श्रुष्टीसाठी हा एक मोठा दिवस ठरला.
दिग्दर्शक – महेश मांजरेकर
प्रदर्शित – २०१६
कलाकार – नाना पाटेकर , मेधा मांजरेकर
५.दगडी चाळ
अंडरवर्ल्डने नेहमीच हिंदी चित्रपट निर्मात्यांना भुरळ घातली आहे. पण हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांना भुरळ घातली त्यातली सर्वांची लाडके पात्र म्हणजेच ड्याडी
दिग्दर्शक – चंद्रकांत कणसे
प्रदर्शित – २०१६
कलाकार – अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे
६.डबलशीट
सुंदर चित्रपट खरोखरच एक आश्चर्यकारक होता. दिग्दर्शन, संवाद, कास्टिंग आणि अभिनय अतिशय सुंदर आहे या चित्रपटा मध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यम वर्गाचे चित्रण करतो. अप्रतिम अभिनय, संवाद आणि दिग्दर्शन.
दिग्दर्शक – समीर विध्वंस
प्रदर्शित – २०१५
कलाकार – अंकुश चौधरी, मुक्त बर्वे
७.किल्ला
‘किल्ला’ हा एक मराठी नाटक चित्रपट आहे जो अमृता शेखर आणि अर्चित देवधर यांनी साकारलेल्या आई आणि मुलाच्या जोडीभोवती निराकरण करतो.अप्रतिम अभिनय, संवाद आणि दिग्दर्शन यांचा संगम आहे हा चित्रपट
दिग्दर्शक – अविनाश अरुण
प्रदर्शित – २०१५
कलाकार – अमृता सुभाष, अर्चित देवधर
८.मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
मराठी चित्रपटांमध्ये बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणता येईल. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांनी छान भूमिका केल्या आहेत.एक भित्रा माणूस होण्यापासून ते नायक होण्या पर्यंत अशा व्यक्तीच्या प्रवासात जो व्यवस्थेतील चुकीचे धाडस करतो आणि लढतो आणि शेवटी एक नायक होतो हा प्रवास आपल्याला पहिला मिळतो.
दिग्दर्शक – महेश मांजरेकर
प्रदर्शित – २००९
कलाकार – सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, सुचित्रा बांधेकर ,प्रिया बापट
९.मुळशी पॅटर्न
या चित्रपटा मध्ये महाराष्ट्राचे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे कसा एक शेतकऱ्याचा मुलगा शेती विकल्यामुळे गुन्हेगारी कडे वळतो आणि त्या गुन्हेगारी विश्वात अडकतो आणि गुन्हेगारी विश्वा पासून दूर राहावे असा मोठा संदेश प्रवीण तरडे यांनी भरकटलेल्या तरुणांना देण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शक – प्रवीण तरडे
प्रदर्शित – २०१८
कलाकार – ओम भूतकर,प्रवीण तरडे,महेश मांजरेकर,मालविका गायकवाड
१०.ती सध्या काय करते
हा सतीश राजवाडे यांचा चित्रपट आहे हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. हे आपल्याला सांगते की मित्रांमधील बंधन कसे दृढ असावे.हे मित्रांमधील प्रेम, विवाद देखील दर्शवते एखादी व्यक्ती त्याच्या चांगल्या मित्राशिवाय कशी अपूर्ण आहे.पहिल्या प्रेमाबद्दल देखील सांगण्याचा प्रयत्न होता हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे.
दिग्दर्शक – सतीश राजवाडे
प्रदर्शित – २०१८
कलाकार – अंकुश चौधरी,तेजश्री प्रधान,अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर
हे पण वाचा –