Top 10 Best Marathi Web Series

Top 10 Best Marathi Web Series

आज या लेखात आपण मराठी मध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या वेब सिरीज पाहणार आहोत ज्या प्रेक्षकांना अत्यंत आवडल्या आहेत. ज्यांनी प्रेक्षकांचा मनावर अधिराज्य गाजवले आहे अशा सुप्रसिद्ध मराठी १० वेब सिरीज पाहणार आहोत. 

मराठी वेब सिरीज

 

मराठी वेब सिरीज | Marathi Web Series

१. समांतर 

समांतर वेब सिरीज मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका आहेत . ही वेब सीरिज मराठी मध्ये अत्यंत सुप्रसिद्ध आहेच परंतु नंतर हिंदी, तेलगू आणि तमिळ मध्ये डब केली गेली. सतीश राजवाडे दिग्दर्शित, समांतर हा सुहास शिरवळकरांच्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित एक थ्रिलर आहे. ही वेब मालिका तुम्हाला एम. क्स. प्लायेर वर पाहायला मिळेल.

२. हाय टायम

ही एक यूट्यूब चॅनेल वरील वेब-मालिका आहे हाय टाइम डार्क कॉमेडी वेब-मालिका आहे. या वेब-मालिका मध्ये आशुतोष गोखले, क्षितीश दाते, साईनाथ गनुवाड, षड्जर्थ महाशब्दे, केतकी नारायण आणि तन्वी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही एक मित्रा-मित्रांची कथा आहे ज्यांनी त्यांचे जीवन आणि अपयश एकत्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि चांगल्या भविष्यासाठी एकमेकांना वचन दिले आहे. जे त्यांच्या मैत्रीला बळकट करण्यावर अवलंबून आहे आणि एकमेकांना कधीही हार मानत नाहीत अशा मित्राची गोष्ट आहे. ही वेब मालिका तुम्हाला यूट्यूब वर पाहायला मिळेल.

३. गोंद्या आला रे 

गोंद्या आला रे हि वेब मालिका दिग्दर्शन अंकुर काकतकर यांनी केले आहे. यात भूषण प्रधान, क्षितीश दाते, शिवराज वैचल, आनंद इंगळे आणि सुनील बर्वे आहेत. ही मालिका चापेकर बंधू वर आधारित आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान झालेल्या पहिल्या क्रांतीवर प्रकाश टाकते. ही वेब मालिका झी 5 ऍप वर पाहायला मिळेल.

४. काळे धंदे

काले धंदे ही एक मराठी कॉमेडी वेब मालिका आहे ज्या मध्ये प्रमुख कलाकार आहेत. महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे आहेत. या वेब मालिकेमध्ये बोल्ड सीन्स ही आहेत शो नवीन युगाची कॉमेडी आहे. विकी या तरुणाचे आयुष्य कसे बदलते याभोवती ही कथा फिरते.तो पुढील गोंधळात अडकतो. हा शो खूपच मनोरंजन करणारा आहे. ही वेब मालिका झी 5 ऍप वर पाहायला मिळेल.

५. पांडू

 ह्या शो मध्ये तुम्हाला शहरातील पोलिसांच्या रोजच्या जीवनात काय काय घडते ते पाहायला मिळते. ही विनोदी वेब मालिका आहे. आणि पोलिस अधिकाऱ्याच्या माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. पांडूचा मुख्य भूमिकेत सुहास सिरसाट आणि ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के आहेत. ही वेब मालिका अनुशा नंदकुमार आणि सारंग साठे यांनी दिग्दर्शित केले आहे.ही वेब मालिका तुम्हाला एम. क्स. प्लायेर वर पाहायला मिळेल.

६. शाळा 

ही तीन शाळकरी मित्रांची कथा आहे जी शाळेत होणाऱ्या गमती जमती वर आधारित आहे.हे तीन मित्र दररोज येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातात. त्या संकटांचा कसा सामना करतात. ही एक सुंदर वयाची कथा आहे,जी तुम्हाला परत एकदा शाळेत घेऊन जाणार आहे. ही वेब मालिका तुम्हाला यूट्यूब वर पाहायला  मिळणार आहे. 

७. मुविंग आउट 

ही एक स्वतंत्र विचाराचा स्त्रीची कथा आहे जी तिच्या आई वडिलांचा घरातून बाहेर पडून तिचा स्वतंत्र जीवन शोध घेऊ पाहते, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते. रीवा ही व्यक्तिरेखेचे नाव आहे, या व्यक्तिरेखेला लढायचे आहे आणि तिच्यावर अटींनियम नुसार आयुष्य जगायचे आहे. अभिज्ञान भावे आणि डॉ.निखिल राजेशिर्के हे मुख्य कलाकार आहेत. ही वेब मलिक तुम्हाला यूट्यूब वर पाहायला मिळेल.

८. सेफ जर्नीज

ही वेब मालिका लैंगिक संबंधित समस्ये वर आधारित आहे. सुरक्षित लैंगिक संबंध, गर्भधारणा, लैंगिक शोषण आणि युवकां मध्ये संमती यावर संवाद प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात ही मालिका तयार करण्यात आली आहे. या वेब मालिकेत सुप्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकार पर्णा पेठे, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, दिप्ती कचरे आणि मृण्मयी गोडबोले आहेत.ही वेब मालिका तुम्हाला यूट्यूब वर पाहायला मिळेल. 

९. वन्स अ इयर

ही एक रोमँटिक कॉमेडी वेब मालिका आहे. या मध्ये मुख्य भूमिका निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांचा आहेत. आणि मंदार कुरुंदर यांनी दिग्दर्शन केले आहे. दोन अतिशय वेगळे लोक कसे भेटतात त्यांच्यात काय काय घडते आणि प्रेमात पडतात आणि नंतर त्यांचे संबंध कसे बिघडतात या वर  ही सुंदर गोष्ट आहे.ही कथा कायम प्रेक्षकांचा अवती भवती फिरत राहते ही वेब मालिका तुम्हाला एम. क्स. प्लायेर वर पाहायला मिळेल.

१०. आणि काय हवं

आणि काय हवा ही वेब मालिका प्रिया बापट आणि उमेश कामत अभिनेते जोडीची आहे या मध्ये या दोघाचा मुख्य भूमिका पाहायला मिळतात ही पुण्यातील एका विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवन कथा आहे. प्रेमाचा एक आनंदी भाग आहे. दोघे एकमेकांवर कसे प्रेम करतात आणि एकत्र स्वप्न पाहतात ही अतिशय रोमँटिक वेब मालिका आहे वरुण नार्वेकर लिखित आणि दिग्दर्शित आहे ही वेब मालिका तुम्हाला एम. क्स. प्लायेर वर पाहायला मिळेल.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment